Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

पक्षी पशू आणि डाकू - Pakshi Pashu Aani Daku

Author: Krupakar-Senani

Publication: Manovikas Prakashan

Category: कथासंग्रह / अनुवादित

Rating:

160

Out of stock

Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra

Description

वीरप्पन हळुवार आवाजात उत्तरला : ‘‘मी हत्तींना मारल्याला अनेक वर्षं लोटली आहेत. पण माझ्या बोलण्यावर लोक विश्‍वास ठेवत नाहीत.’’ वन्यजीव छायाचित्रकार कृपाकर आणि सेनानी यांचं एका रात्री बंदीपूर अभयारण्याच्या सीमेवर असलेल्या त्यांच्या घरातून अपहरण केलं गेलं ते समजुतीच्या घोटाळ्यातून. हे अपहरण केलं होतं वीरप्पन या भयंकर डाकूनं. त्याची अशी समजूत झाली होती की ही छायाचित्रकार द्वयी म्हणजे महत्त्वाचे सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे त्याचा डाव असा होता की त्यांना ओलीस धरून भरघोस खंडणी आणि माफी या दोन्ही गोष्टी वसूल करायच्या. वीरप्पन आणि त्याची टोळी या ओलिसांना घेऊन जंगल तुडवत राहिली. बाह्य जगाशी त्यांचा संपर्क होता तो एका जुन्या रेडिओद्वारा. ज्या वीरप्पननं जवळजवळ अडीचशे माणसांना मारलं होतं, ते सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्या म्हणून. वेगवेगळे डाव रचत असताना दोन्ही ओलीस मात्र कर्नाटक आणि तामिळनाडूच्या जंगलातील जैववैविध्याचा अनुभव घेत होते. त्याचबरोबर या प्रवासात वीरप्पनला जवळून बघण्याची संधी मिळाली तेव्हा त्याच्यामध्ये एकवटलेल्या क्रौर्य आणि माणुसकी या परस्परविरोधी भावनांच्या दर्शनानं ते कोड्यात पडले. कृपाकर आणि सेनानी यांचं जग वीरप्पन आणि त्याच्या टोळीपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. पण तरीही या अपहरणनाट्यात अपहृत आणि अपहरणकर्ते यांच्यात एक अनामिक स्नेहबंध निर्माण झाला. ‘पक्षी, पशू आणि डाकू’ हे पुस्तक म्हणजे कुप्रसिद्ध डाकू आणि त्याच्या टोळीबरोबर आलेल्या नर्म आणि हृदयस्पर्शी अनुभवांचं चित्रण करणारी साहसगाथा आहे

Reviews

No review available. Be the first to review this book.

Write Review

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल