Suyash book gallery
Home | अनुवादित | लेख | कथासंग्रह | कादंबरी | ऐतिहासिक | चरित्र | निबंध | साहित्य आणि समीक्षा | ललित | आत्मचरित्र | आत्मकथन | बालसाहित्य | कवितासंग्रह | माहितीपर | अनुभव कथन | स्त्री-विषयक | नाटक | विज्ञान-पर्यावरण | वैचारिक | व्यक्तिचित्रण | मार्गदर्शनपर | शैक्षणिक | प्रवासवर्णन | दलित साहित्य-डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य | आरोग्यविषयक | राजकीय | बिझनेस आणि व्यवस्थापन | विनोदी | शेती विषयक | धार्मिक-अध्यात्मिक | आध्यात्मिक | संगीत विषयक | कायदेविषयक | स्पर्धा परिक्षा MPSC-UPSC-SET-NET-STI-PSI-ASST | कॉम्प्युटर विषयक | पाककला | ज्योतिष | शिवणकला-विणकाम | संदर्भग्रंथ |

बोल माधवी - Bol Madhavi

Author: Asavari Kakade

Publication: Rajhans Prakashan

Category: अनुवादित / कवितासंग्रह

Rating:

125

Qty:

In Stock

Standard delivery in 7-8 working days for Maharashtra and 14-15 days for out of Maharashtra

Description

उत्कृष्ट अनुवादासाठीचा ’साहित्य अकादमी’चा पुरस्कार लाभलेल्या या काव्यसंग्रहाचा गोवा विद्यापीठामधल्या एका पदव्युत्तर अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. महाभारतातली ही कथा. ’गालव’ हा ’विश्वामित्र’ ऋषींचा शिष्य. त्याच्या आग्रहाखातर विश्वामित्र त्याच्याकडे ८०० श्यामकर्णी घोड्यांची दक्षिणा मागतात. ती देण्याची ऐपत नसलेला गालव राजा ’ययाती’कडे जातो. ययातीकडेही तेवढं द्रव्य नसतं, परंतु याचकाला विन्मुख पाठवायचं नाही म्हणून तो आपली रुपमती मुलगी ’माधवी’ विनियोगासाठी गालवाला देतो. तिला ३ राजांकडे प्रत्येकी १ वर्ष गालव उपभोगासाठी ठेवतो. वर्षानंतर प्रत्येकाकडून २०० श्यामकर्णी घोडे घेऊन ६०० घोड्यांची दक्षिणा विश्वामित्राला देतो. विश्वामित्र स्वतःकडे माधवीला वर्षभर ठेवतात आणि उरलेल्या २०० घोड्यांची दक्षिणा माफ करून टाकतात. त्यानंतर ययाती तिचं स्वयंवर मांडतो, परंतु ती सगळ्यांना अव्हेरून तपोवनात निघून जाते. अशी ही आदर्श गुरू, त्याचा आज्ञापालनकर्ता थोर शिष्य आणि नरोत्तम राजा ययाती यांची गोष्ट... यात ’माधवी’चं स्थान काय? तिच्या इच्छा काय? तिला कसं समजावून घ्यायचं? तिच्यापर्यंत कसं पोचायचं? ’माधवी’च्या वेदनेचं महाभारत जाणून तडफडणार्‍या डॉ. देवल यांनी चहुअंगांनी तिचा वेध घेतला आहे. आणि तरीही हे करताना ते ’स्त्री’ च्या भूमिकेत शिरलेले नाहीत. पुरुष आणि स्त्री आदिअंतापर्यंतचं सत्य निखळपणे, प्रगल्भपणे अन् विनम्रपणे स्वीकारून ’माधवी’ रूपानं स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार्‍या व्यथा-वेदनांना ते निर्विषपणे सामोरे गेले आहेत. स्त्री प्रश्नांची दाहकता पुरुषांना जाणवली, तर ती किती थेटपणे भिडू शकते, याचं हा काव्यसंग्रह मूर्तिमंत प्रतीक आहे. कवीचं, त्याच्या काव्याचं अन् अनुवादाचं हे रूप फार विरळा आहे. वाचावंच असं -

Reviews

No review available. Be the first to review this book.

Write Review

हि पुस्तक सुद्धा तुम्हाला आवडेल